पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी नावनोंदणीस मुदतवाढ; 19 जूनपर्यंत ऑनलाईन नोंदणी
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन नावनोंदणी आणि अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. 19 जून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही मुदतवाढ असून या कालावधीत प्रवेशपूर्व नोंदणी ते अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
मुंबई विद्यापीठामार्फत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, 22 मे ते 15 जून या कालावधीत ऑनलाईन नावनोंदणी ते अर्ज सादर करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र एखाद्या विद्यार्थ्यांस काही अपरिहार्य कारणास्तव नोंदणी ते अर्ज सादर करण्यास उशीर झाला असल्यास त्यांना संधी मिळावी या उद्देशाने ही मुदतवाढ दिली जात असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. तसेच विद्यापीठाच्या प्रचलित नियमानुसार व वेळापत्रकानुसार गुणवत्ता यादी ही त्या- त्या महाविद्यालयामार्फत व विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक विभागाद्वारे जाहीर केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List