अँटॉप हिल भागात चाळीची भिंत कोसळून दुर्घटना, दोन महिलांचा मृत्यू

अँटॉप हिल भागात चाळीची भिंत कोसळून दुर्घटना, दोन महिलांचा मृत्यू

मुंबईतल्या वडाळा अँटॉप हिल भागात चाळीची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.  या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला. मुंबईतल्या अँटॉप हिल भागातल्या विजय नगर येथील पंजा गल्लीतील ही घटना आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील भिंतीचा काही भाग कोसळून ही घटना घडली आहे. स्थानिक अग्निशमन दल, वॉर्डस्तरीय कर्मचारी, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

शोभादेवी मौर्य (45) आणि झाकिरुन्निसा शेख (50) या दोन महिलांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या दोन महिलांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 9.30 च्या सुमारास वडाळा अँटॉप हिलच्या विजय नगरमधील पंजा गल्ली परिसरात ही घटना घडली. चाळीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील आणि वरच्या तीन मजल्यांवरील भिंतीचा काही भाग कोसळला होता.तर काही भाग लटकलेल्या स्थितीत होता अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;