जितेंद्र जोशी – उपेंद्र लिमयेची जबरदस्त जोडी; फलटण, वाईमध्ये ‘बंधू’च्या शूटिंगला सुरूवात

जितेंद्र जोशी – उपेंद्र लिमयेची जबरदस्त जोडी; फलटण, वाईमध्ये ‘बंधू’च्या शूटिंगला सुरूवात

सान्वी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत ‘बंधू’ या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण फलटण आणि वाईमध्ये धडाक्यात सुरू झालं आहे. चित्रपटाच्या सेटवर चित्रीकरणाची सुरूवात करत नुकताच मुहूर्त सोहळा पार पडला. यावेळी दिग्दर्शक, निर्माते यांच्याबरोबर कलाकारही उपस्थित होते. चित्रीकरणाला सुरुवात झाली म्हणजेच आता लवकरात लवकर ‘बंधू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबाबत काही शंका नाही. ‘आटपाडी नाईट्स’, ‘सरला एक कोटी’च्या यशानंतर लेखक – दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर यांच्याकडून पुन्हा एकदा वेगळा विषय हाताळण्यात आला आहे. ‘बंधू’ या चित्रपटातून प्रेक्षकांना उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी या दोन कसलेल्या कलाकारांची जबरदस्त जोडी पाहायला मिळणार आहे.

ॲनिमल या हिंदी चित्रपटानंतरच्या यशानंतर आता ‘बंधू’ या आगळ्यावेगळ्या चित्रपटातून उपेंद्र लिमये हा एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. जिथे राम आहे.. तिथे लक्ष्मण तर येणारच, असं टॅगलाईन त्याला देण्यात आलं आहे. यावरुनच ही दोन भावांमधील प्रेमाची गोष्ट आहे हे समजतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Upendra Limaye (@upendralimaye)

या चित्रपटाबद्दल सांगताना लेखक, दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर म्हणाले, “मी नेहमीच सामाजिक आरोग्य सुधारणारे चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करतो. समाजाच्या आरोग्याचं नुकसान होईल अशा आशयाचे चित्रपट मी हाताळत नाही. याआधी मी पती – पत्नीवर आधारित चित्रपट केले आहेत. तर आता ‘बंधू’ च्या निमित्ताने मी भावाभावांमधील प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.आताच्या सोशल मिडिया आणि स्पर्धात्मक युगामध्ये नाती दूर होत चालली आहेत. त्यामुळे भावाभावांच्या नात्यावर भाष्य करणं मला गरजेचं वाटलं. दुरावलेली नाती प्रेमाच्या ओल्याव्याने कशी जवळ येतात हे ‘बंधू’ या चित्रपटात दाखविण्यात आलं आहे.”

या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर असून निर्माती आरती चव्हाण या आहेत. तर कार्यकारी निर्माते विनोद नाईक आहेत. प्रोजेक्ट हेडची जबाबदारी वैभव शिरोळकर यांनी सांभाळली असून सिनेमॅटोग्राफीचं काम हर्षद आत्माराम गायकवाड यांनी केलं आहे. या चित्रपटाला विजय नारायण गावंडे यांचं संगीत आहे. तर गीतरचनेची धुरा गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांनी सांभाळली आहे. कला दिग्दर्शक नितीन गणपत बोरकर हे आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;