त्यांच्या छुप्या अजेंड्यामुळे ‘गदर 2’ गटारात गेला असता..; अमीषा पटेलचा दिग्दर्शकांवर गंभीर आरोप

त्यांच्या छुप्या अजेंड्यामुळे ‘गदर 2’ गटारात गेला असता..; अमीषा पटेलचा दिग्दर्शकांवर गंभीर आरोप

अभिनेत्री अमीषा पटेलने बऱ्याच वर्षांनंतर ‘गदर 2’ या चित्रपटातून पुनरागमन केलं. सनी देओलसोबतचा तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमीषाने या चित्रपटाच्या दिग्दर्शकांवर आरोप केला आहे. ‘गदर 2’चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा या चित्रपटामागे छुपा अजेंडा होता, म्हणूनच मी आणि सनीने पडद्यामागे राहून या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय, असा दावा तिने केला आहे. “सनी देओल आणि माझ्याकडून या चित्रपटात बऱ्याच दुरुस्त्या केल्या गेल्या आहेत. म्हणूनच तो असा चित्रपट बनू शकला. यासाठी आम्ही भरपूर एडिटिंग आणि पुन्हा-पुन्हा शूटिंग केली. या सर्व प्रक्रियेदरम्यान आमची दिग्दर्शकांसोबत बरीच भांडणंसुद्धा झाली”, अशी कबुली अमीषाने दिली आहे.

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत अमीषाने ‘गदर 2’ या चित्रपटाविषयी बरेच दावे केले आहेत. “या चित्रपटात माझ्याकडून आणि सनी देओल यांच्याकडून बरेच बदल करण्यात आले आहेत. यामुळेच तो प्रेक्षकांना आवडण्यालायक बनू शकला. कारण दिग्दर्शक ‘गदर 2’ला अशा मार्गेकडे घेऊन जात होते, जे पाहून आम्ही नाखुश झालो होतो. यासाठी आम्हाला पुन्हा पुन्हा बरीच शूटिंग आणि एडिटिंग करावी लागली. हा संपूर्ण प्रवास काही सोपा नव्हता. सनी देओल आणि माझे दिग्दर्शकांसोबत बरेच मतभेद झाले होते. चित्रपटातील सीन्स, गाणी आणि कोरिओग्राफीमध्येही आम्ही योगदान दिलं होतं. त्यामुळे या चित्रपटाचे आम्ही जणू ‘घोस्ट डायरेक्टर्स’ (छुपे दिग्दर्शक) आहोत. अनिल शर्मा यांचा छुपा अजेंडा हा त्यांना मूळ कथेपासून दूर नेत होता”, असा खुलासा अमीषाने केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

अमीषाने तिचा बिझनेस पार्टनर कुणाल घूमरला या चित्रपटाच्या यशाचं श्रेय दिलं. चित्रपटाचं शूटिंग चुकीच्या मार्गाने होत असताना कुणालने हस्तक्षेप करून सर्वकाही योग्य मार्गावर आणलं, असं ती म्हणाली. जर कुणालने त्याच्या कलात्मक विचारांनी हा चित्रपट वाचवला नसता तर ‘गदर 2’ हा चित्रपट गटारात गेला असता, अशी सणसणीत टीका अमीषाने या मुलाखतीत केली.

अमीषाला या मुलाखतीत ‘गदर 3’ विषयी प्रश्न विचारण्यात आला. या तिसऱ्या चित्रपटाचा भाग ती आहे की नाही, याबद्दल तिलाही अद्याप कल्पना नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र तिसऱ्या भागाची ऑफर मिळाली तर माझ्या काही अटी असतील, असंही ती म्हणाली. चित्रपटात तिच्या सकिनाच्या आणि सनी देओलच्या ताराच्या भूमिकेला पुरेसा स्क्रीन टाइम मिळाला, तरच तिसऱ्या भागात काम करणार असल्याची अट तिने मांडली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;