सलमान खानच्या आईने आयुष्यात…, सलीम खान – हेलन यांच्या लग्नानंतर कुटुंबात कशी होती परिस्थीती?
बॉलिवूडच्या खान कुटुंबाला आज कोणी ओळखत नाही असं कोणीच नाही… चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर कायम खान कुटुंबाबद्दल चर्चा रंगलेल्या असतात. बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक सलीम खान यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेता सलमान खान याने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. तर अरबाज आणि सोहेल यांनी देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं. सिनेमांमध्ये अग्रेसर असताना खान कुटुंब खासगी गोष्टीमुळे कायम चर्चेत असतं.
सध्या सलीम खान यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. सलीम खान यांनी 1964 मध्ये सलमा खान यांच्यासोबत लग्न केलं. सलमा आणि सलीम यांना चार मुलं देखील आहेत. सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान आणि अलवीरा खान अशी त्यांच्या चार मुलांची नावे आहेत.
चार मुलांच्या जन्मानंतर देखील सलीम खान यांनी 1981 मध्ये हेल यांच्यासोबत लग्न केलं. सलीम यांना चार मुलं असल्यामुळे हेलन यांनी कधीच स्वतःच्या मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला नाही. अशात दोघांनी अर्पिता खान हिला दत्तक घेतलं. हेलन – सलीम यांच्या लग्नाला 43 वर्ष झाली आहेत. 43 वर्षांनंतर हेलन यांनी लग्नानंतर समोर आलेल्या परिस्थितीचा खुलासा करत भावूक झाल्या.
अभिनेता अरबाज खान याच्या शोमध्ये हेलन म्हणाल्या, ‘कुटुंबाची विभागलं जाईल असं मला काहीही करायचं नव्हतं. सलीम त्यांच्या पहिल्या पत्नीपासून आणि मुलांपासून दूर होतील असं देखील मला काहीही करायचं नव्हतं. त्यांच्या कुटुंबाला विभक्त करेल… असे विचार देखील कधी माझ्या मनात आले नाहीत. पण एवढं नक्की बोलेल की तुझ्या आईने अनेक गोष्टींचा सामना केला आहे…’
‘तेव्हा ज्या काही गोष्टी घडल्या त्यामध्ये काही चांगल्या गोष्टी देखील होत्या आणि त्याचं श्रेय मी तुझ्या आईला सलमा यांना देईल. त्यादरम्यान सलमा यांनी अनेक कठीण परिस्थितींचा सामना केला. सलमा यांना अनेक गोष्टींचा त्रास देखील झाला. पण त्यांनी हार न मानता सर्व प्रसंगांचा सामना केला. मी नशिबाचे आभार मानेल की, काही काळानंतर तुमच्या सर्वांसोबत माझं नातं घट्ट झालं…’ असं देखील हेलन म्हणाल्या.
हेलन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, एक काळ असा होता जेव्हा त्यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होतं. आजही त्यांची एक झलक पाहाण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अनेक कार्यक्रमांमध्ये देखील त्यांना सलमान खान याच्यासोबत स्पॉट केलं जातं. शिवाय फॅमिली फोटोमध्ये देखील हेलन असतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List