पंढरपूर ते आळंदी मार्ग अवघ्या दीड वर्षात खचला, दहा हजार कोटी पाण्यात
आषाढ वारी अगदी तोंडावर आलेली असतानाच ज्या मार्गाने संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या पालख्या जातात तो पंढरपूर ते आळंदी मार्गावरील रस्ता खचला आहे. धक्कादायक बाब अशी की हा रस्ता अवघ्या दीड वर्षापूर्वी तब्बल दहा हजार कोटी खर्च करून बांधण्यात आला होता. त्यामुळे आता या रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित असलेला आहे.
पंढरपूरला जाणारे लाखो भाविक या मार्गावरून वारीच्या वेळी प्रवास करणार आहेत त्यामुळे राष्ट्रीय महारामार्ग प्राधिकरणाने लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करावे व यावेळी चांगल्या दर्जाचे काम करावे अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List