रत्नागिरी : अणुस्कूरा घाटात दरड कोसळली, कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प
रत्नागिरी जिल्ह्यात मसुळधार पाऊस सुरू आहे. आज रात्री राजापूर तालुक्यातील अणुस्कूरा घाटातील दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक आंबा घाटमार्गे वळविण्यात आली आहे.
अणुस्कुरा घाटात कोसळलेली दरड हटवण्यासाठी राजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जेसीबीने ही दरड बाजूला हटवण्याचे काम सुरू आहे. मोठे खडक फोडून ही दरड हटवण्यासाठी ब्लास्टींग मशीनदेखील घटनास्थळी मागवण्यात आले आहे. ही दरड हटवल्यानंतर या मार्गावरुन होणारी वाहतूक सुरु केली जाईल. तोपर्यंत आज रात्री अणुस्कुरा घाट वाहतुकीसाठी बंद केला आहे, अशी माहिती राजापूरच्या उपविभागीय अधिकारी वैशाली माने यांनी दिली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List