Photo : राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम

Photo : राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्तदान शिबिर, महाआरोग्य शिबीर, शैक्षणिक साहित्याचे वाटप, गरजूंना मदत, अन्नदान, रुग्णांना फळ वाटप, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Displaying IMG-20240613-WA0026.JPG

शाखा क्र. 222 चे उपविभागप्रमुख संपत ठाकूर आणि युवती सेना विभाग अधिकारी पायल ठाकूर यांच्या वतीने छत्री वाटप करण्यात आले. यावेळी उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजकुमार बाफना, विभागप्रमुख संतोष शिंदे, युगंधरा साळेकर, सरिता तांबट, विशाखा पेडणेकर, मंगेश सावंत, माधुरी पेंढारीदिपन मोघे, रूपेश बोंबले, अभिजित देवरुखकर उपस्थित होते.

Displaying IMG-20240613-WA0027.JPG

सुभाष डामरे मित्रमंडळ आणि शिवराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आनंद गावकर आणि संचालक सुधीर साळवी, संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोयबावडी शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना चित्रकला साहित्य खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला रवींद्र कुवेसकर, पराग चव्हाण, उर्मिला पांचाळ यांच्यासह नाना फाटक, कार्याध्यक्ष प्रभाकर मोरजकर, संतोष कांबळी उपस्थित होते.

Displaying IMG-20240613-WA0017_Darade.JPG

शाखा क्र. 210 च्या वतीने शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर यांच्या उपस्थितीत वुमन वेलफेअर सोसायटी ऑफ डायोसीज ऑफ बॉम्बे ऑल सेंट्स होम वृद्धाश्रमातील मातांना फळवाटप करण्यात आले. उपविभाग संघटक सोनम जामसुतकर, सूर्यकांत पाटील, सुहास भोसले, प्रमोद लाड, अमित जाधव, सुरेश चलवादी उपस्थित होते.  

Displaying IMG-20240613-WA0035.JPG

शिवसेना शाखा क्र. 22 तर्फे विभागप्रमुख अजित भंडारी, विभाग संघटक मनाली चौकीदार यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाप्रमुख प्रसाद पाटील, शाखा संघटक रेखा कदम यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात बिस्कीट, पॅडबरी आणि पाणी वाटप करण्यात आले. यावेळी संतोष राणे, शाम मोरे, प्रदीप वस्त, सीमा लोकरे, राजकुमार पवार, स्वप्नील निंबरे, महादेव कदम, किशोर कनोजिया, अमित मन्वाचार्य उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;