डोंबिवलीत 45 केमिकल कंपन्यांना टाळे ठोकणार; लागोपाठच्या स्फोटानंतर शहाणपण

डोंबिवलीत 45 केमिकल कंपन्यांना टाळे ठोकणार; लागोपाठच्या स्फोटानंतर शहाणपण

अमुदान कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात 17 बळी गेल्याच्या घटनेला अवघे 23 दिवस उलटतात तोच इंडो अमाईन आणि मालदे कंपनीत झालेल्या भीषण अग्नितांडवाने डोंबिवली पुन्हा हादरली. कुंभकर्णी झोपेत असलेल्या मिंधे सरकारला त्यानंतर खडबडून जाग आली असून राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज डोंबिवली एमआयडीसीतील 45 कंपन्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत. प्रदूषण मंडळाने या सर्व कंपन्यांना क्लोजर नोटिसा बजावल्या आहेत.

डोंबिवली एमआयडीसीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून अनेक दुर्घटना घडत असून आतापर्यंत काहींना आपला जीवदेखील गमवावा लागला. 23 मे रोजी अमुदान कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन महिना उलटत नाही तोच बुधवारी सकाळी पुन्हा इंडो अमाईन या कंपनीला आग लागली. ही आग एवढी भीषण होती की, त्याची झळ शेजारच्या मालदे कंपनीला बसली आणि ही कंपनीदेखील भस्मसात झाली. दैव बलवत्तर म्हणून सुमारे वीस कामगारांचे प्राण वाचले. मात्र या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्फोट व आगीचे प्रकार सतत घडत असल्याने त्याची गंभीर दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेऊन एमआयडीसीमधील 45 कंपन्यांना नोटिसा पाठवल्या आहेत.

20 जूनपर्यंत समितीचा अहवाल येणार
धोकादायक कंपनीच्या यादीत इंडो अमाईन आणि मालदे या पंपन्यांचादेखील समावेश होता. प्रदूषणकारी व धोकादायक कंपन्यांना रेसिडेन्शिअल विभागातून स्थलांतर करण्याबाबत विचार सुरू आहे. त्या अनुषंगाने विशेष समितीच्या तीन बैठका झाल्या आहेत. 20 जूनपर्यंत सर्वेक्षण समिताचा अहवाल येणार असून त्यानंतच कृती आराखडा तयार करणार असल्याचे महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

या घटनेनंतर सरकारने गणेश पॉलिकेम, घरडा केमिकल, ऑक्टल प्रोडक्शन, मेट्रो पॉलिटेन, क्वालिटी इंडस्ट्रिज यांसह प्रदूषणकारी कंपन्या तळोजा एमआयडीसीत स्थलांतरित करण्याचा घेतलेला निर्णय कागदावरच आहे.
36 कंपन्यांनी जल व वायू कायद्याचे उल्लंघन केल्याने त्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. तर उर्वरित 9 कंपन्यांनीदेखील कायदा धाब्यावर बसवल्याने मालकांना स्वत:हून उत्पादन बंद करण्यास सांगितले आहे.

– डोंबिवली एमआयडीसीत 432 कारखाने आहेत. यापैकी 250 ते 275 कंपन्या धोकादायक आणि अतिधोकादायक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;