पालिकेचे आठ हजार कर्मचारी अजूनही निवडणूक डय़ुटीवरच

पालिकेचे आठ हजार कर्मचारी अजूनही निवडणूक डय़ुटीवरच

निवडणूक कामासाठी गेलेले पालिकेचे आठ हजारांवर कर्मचारी अजूनही निवडणूक डय़ुटीवरच असल्याने पालिकेच्या पावसाळापूर्व कामांचा प्रचंड खोळंबा होत आहेत. त्यामुळे निवडणूक डय़ुटीला गेलेल्या कर्मचाऱयांना निवडणूक कामातून मुक्त करावे, अशी मागणी केली जात आहे. पालिकेचे 10 हजार 400 कर्मचारी मार्चपासून निवडणूक डय़ुटीवर गेले होते. यातील केवळ 20 टक्केच कर्मचारीच आतापर्यंत पुन्हा पालिकेत रुजू झाले आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी यांच्या सेवा अधिग्रहीत केलेल्या कार्यालयीन कर्मचाऱयांना तातडीने कार्यमुक्त केले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी घोषित केले असले तरी आजही निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या मुंबई महापालिका कर्मचाऱयांपैकी 80 टक्के कर्मचारी हा पुन्हा पालिकेत परतलेलाच नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी दोन्ही जिल्हाधिकाऱयांना पत्र पाठवून या कर्मचाऱयांना त्वरित कार्यमुक्त करावे, अशी सूचना केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;