‘मिंधे’ सरकारकडून आंदोलन बेदखल; आशा–आरोग्य सेविकांचे आंदोलन पेटणार

‘मिंधे’ सरकारकडून आंदोलन बेदखल; आशा–आरोग्य सेविकांचे आंदोलन पेटणार

न्यायालयाचे आदेश असतानाही पगारवाढ आणि प्रलंबित मागण्यांसाठी तीन दिवस आंदोलन करूनही कोणतीही दखल न घेणाऱया मिंधे सरकारविरोधात आशा सेविका आणि आरोग्य सेविकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. त्यामुळे आशा-आरोग्य सेविकांचे आंदोलन पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आशा सेविका आणि आरोग्य सेविकांच्या पगारवाढीसह अनेक मागण्यांसाठी वारंवार आंदोलने करूनही सरकार कोणतीही दखल घेत नाही.  मार्चमध्ये झालेल्या आंदोलनानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी पगारवाढीचे आश्वासन दिले, मात्र याबाबत अद्याप कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आशा-आरोग्य सेविकांनी मंगळवारपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. स्वतः मुख्यमंत्री चर्चा करून मागण्या मान्य करीत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आशा-आरोग्य सेविकांकडून देण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी दिली.

z आशा सेविकांना सहा हजार रुपये वेतन, दर महिन्याला 1 ते 10 तारखेदरम्यान वेतन मिळावे, आरोग्य सेविकांच्या रिक्त पदांवर आशा सेविकांची नियुक्ती करावी अशा त्यांच्या मागण्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;