‘या’ विद्यापाठीत परफॉर्म करण्यास सनी लिओनीला नाकारली परवानगी, अखेर कारण..

‘या’ विद्यापाठीत परफॉर्म करण्यास सनी लिओनीला नाकारली परवानगी, अखेर कारण..

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सनी लिओनीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सनी लिओनीने भारतामध्ये बिग बॉसच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरूवात केली. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात असतानाच सनी लिओनी हिला बॉलिवूडच्या चित्रपटाची ऑफर मिळाली. तेंव्हापासून सनी लिओनीने आपल्या करिअरमध्ये मागे वळून बघितले नाही. अनेक चित्रपटांमध्ये सनी लिओनीने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. सनी लिओनी ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे. मोठा चाहतावर्ग देखील तिचा आहे.

सनी लिओनी सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच सनी लिओनी ही तिच्या रद्द झालेल्या डान्स शोमुळे आता चर्चेत आलीये. सनी लिओनी हिचा केरळमधील युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॅम्पसमध्ये 5 जुलै रोजी डान्स शो होणार होता.

या शोची तयारी जवळपास पूर्ण झाली. मात्र, अचानकपणे या डान्स शोसाठी परवानगी नाकारण्यात आली. कॉलेज कॅम्पसमध्ये सनीचा शो आयोजित केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. हेच नाही तर याबद्दलच्या सूचना देखील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहनन कुनुमल यांनी कुलसचिवांना दिल्या.

गेल्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये एका कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गर्दी इतकी जास्त वाढली होती की, तिथे चेंगराचेंगरी झाली. हेच नाही तर या चेंगराचेंगरीमध्ये चार विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. जवळपास 60 पेक्षाही अधिक विद्यार्थी यामध्ये जखमी झाले होते.

मनोरमा आणि मातृभूमी कार्यक्रमांच्या यादीत सनीच्या डान्स शोचा समावेश न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सनी लिओनी हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये चक्क हेअर स्टायलिस्टला मारहाण करताना सनी लिओनी ही दिसली होती. सनी लिओनी ही तिच्या हेअर स्टायलिस्टसोबत फक्त मजाक करत होती, हे व्हिडीओमध्ये शेवटी दिसले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;