कंगना राणावत हिचे मोठे विधान, थेट म्हणाली, राजकारणापेक्षा चित्रपटात काम करणे…

कंगना राणावत हिचे मोठे विधान, थेट म्हणाली, राजकारणापेक्षा चित्रपटात काम करणे…

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत ही सध्या तूफान चर्चेत आहे. कंगना राणावतची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. कंगना राणावत हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. कंगना राणावत सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. विषय कोणताही असो कंगना राणावत ही आपले मत मांडताना दिसते. कंगना राणावत हिने लोकसभा निवडणूक मंडी येथून लढवली आहे आणि मोठ्या लीडने ती निवडून देखील आलीये. कंगना राणावत हिच्यासोबत एक हैराण करणारा प्रकार घडलाय.

चंदीगड विमानतळावर कंगना राणावत हिच्या थेट कानाखाली मारण्यात आली. ज्यानंतर त्या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. कंगना राणावत हिच्या चाहत्यांमध्ये या घटनेनंतर संताप बघायला मिळाला. सीआयएसएफ गार्ड महिलेने कंगना राणावत हिच्या कानाखाली मारली. शेतकरी आंदोलनाला कंगनाने विरोध केल्याने या महिलेने तिच्या कानाखाली मारली.

आता नुकताच कंगना राणावत हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना कंगना राणावत दिसत आहे. कंगना राणावत हिने म्हटले की, मला गेल्या काही वर्षांपासून सतत राजकारणात येण्यासाठी ऑफर येत होत्या. मीच नाही तर माझे वडील, बहीण यांना देखील राजकारणात येण्यासाठी यापूर्वी अनेकदा ऑफर मिळाल्या.

कंगना राणावत पुढे थेट म्हणाली की, मुळात म्हणजे चित्रपटांमध्ये काम करणे सोपे आहे, राजकारणात काम करणे नक्कीच अवघड आहे. राजकारणात खूप जास्त मेहनत करावी लागते. डॉक्टरांसारखे आहे, तुमच्याकडे फक्त त्रस्त लोक येतात. जेंव्हा तुम्ही चित्रपट पाहण्यासाठी जातात, त्यावेळी तुम्ही निवांत होतात. मात्र, राजकारणात अजिबात असे नाहीये.

पुढे कंगना राणावत म्हणाली की, ज्यावेळी मुंबईतील बांद्रा परिसरातील माझे घर तोडले गेले त्यावेळी मला माझ्या खूप जास्त दबाव जाणवला. माझ्यासोबत हिंसा झाल्यासारखे मला वाटत होते. माझे घर तोडले गेल्याचे देखील कंगना राणावत हिने म्हटले. आता कंगना राणावत हिने केलेल्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. कंगना राणावत कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;