अश्विनी भावे-अजिंक्य देव यांची जोडी पुन्हा जमली; ‘घरत गणपती’चा टीझर पाहिलात का?

अश्विनी भावे-अजिंक्य देव यांची जोडी पुन्हा जमली; ‘घरत गणपती’चा टीझर पाहिलात का?

आजवर रुपेरी पडद्यावर नायक-नायिकेच्या अनेक लोकप्रिय जोड्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवणारी अशीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे अजिंक्य देव आणि अश्विनी भावे. लवकरच पुन्हा एकदा ही जोडी ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज आणि नॅविअन्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘घरत गणपती’ हा चित्रपट येत्या 26 जुलैला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचं असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.

शरद घरत आणि अहिल्या घरत या व्यक्तिरेखा ते साकारणार आहेत. या चित्रपटात अजिंक्य देव कुटुंबवत्सल पती, प्रेमळ वडिल अशा भूमिकेत दिसणार असून कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहणाऱ्या करारी आईची व्यक्तिरेखा अश्विनी भावे साकारणार आहेत. “याआधी ‘शाब्बास सूनबाई’,‘मायेची सावली’,‘चल गंमत करू’, ‘सरकारनामा’ या चित्रपटांद्वारे आमच्यातली केमिस्ट्री पडद्यावर चांगलीच खुलली आता २५ वर्षांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करण्याचा आनंद व्यक्त करीत, आमची केमिस्ट्री रसिकांना आनंद देईल,” असं हे दोघं सांगतात. चित्रपटाचा सुंदर विषय आणि आमचं काम प्रेक्षकांना नक्कीच भावेल, असा विश्वासही दोघांनी व्यक्त केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Panorama Studios (@panorama_studios)

आधीच्या चित्रपटातील अश्विनी भावे आणि अजिंक्य देव या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली असल्याने ही जोडी पुन्हा एकत्र येणं हा ‘घरत गणपती’ चित्रपटाचा सर्वात मोठा ‘प्लस पॉइंट’ आहे. ‘श्री गणराया’च्या आगमनाच्या निमित्ताने घरत कुटुंबातल्या अनुबंधाची हलकी-फुलकी गोष्ट ‘घरत गणपती’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अश्विनी भावे आणि अजिंक्य देव यांच्यासोबतच भूषण प्रधान, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, संजय मोने, सुषमा देशपांडे यांच्याही भूमिका आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;