दलजीत कौरच्या पूर्व पतीला 200 विंचूंनी चावलं; सुजला चेहरा, बोलताही येईना!
विविध स्टंट्सवर आधारित रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी'च्या 14 व्या सिझनचं शूटिंग सध्या रोमानियामध्ये केलं जातंय. या शोमध्ये बिग बॉसमधील बरेच माजी स्पर्धक सहभागी झाले आहेत. अभिनेत्री दलजीत कौरचा पूर्व पती आणि अभिनेता शालीन भनोतसुद्धा यामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे.
या शोमधील एका स्टंटदरम्यान शालीनला बरीच दुखापत झाली आहे. त्याचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. 'खतरों के खिलाडी'च्या सेटवरील हा व्हिडीओ असून त्याच्या चेहऱ्यावर बरीच सूज आल्याचं पहायला मिळतंय.
या व्हिडीओमध्ये सेटवर उपस्थित असलेली मेडिकल टीम आणि डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत. तर शालीनच्या दाढेजवळ आणि चेहऱ्याला इतर ठिकाणी सूज पहायला मिळतेय. हा व्हिडीओ पोस्ट करत शालीनने लिहिलं, 'तुमच्यासाठी काहीपण..'
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List