चेन्नईमधील मंदिरात पार पडलं ऐश्वर्याचं लग्न; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अर्जुन सर्जाची मुलगी ऐश्वर्या अर्जुन नुकतीच लग्नबंधनात अडकली. अभिनेता-दिग्दर्शक थंबी रामैय्या यांचा मुलगा उमापती रामैय्याशी तिने लग्न केलं. ऐश्वर्या आणि उमापती हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
10 जून रोजी चेन्नईत हा लग्नसोहळा पार पडला. ऐश्वर्या आणि उमापती यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. या लग्नसोहळ्यात ऐश्वर्याने लाल आणि सोनेरी रंगाची पारंपरिक पट्टू साडी नेसली होती. तर उमापतीने मोती रंगाचा धोती सेट परिधान केला होता.
चेन्नईमधील अंजनसुता श्री योगंजनेयस्वामी मंदिरात सकाळी 9 ते 10 या वेळेत हा लग्नसोहळा पार पडला. यावेळी मोजके पाहुणे आणि मित्रपरिवार उपस्थित होता. ऐश्वर्या आणि उमापतीच्या लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांसोबत सेलिब्रिटींनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List