…तर प्रतिभा धानोरकर नाव लावणार नाही, सहा विधानसभा क्षेत्रात भाजपाचा सुपडा साफ करण्याची घेतली प्रतिज्ञा…

…तर प्रतिभा धानोरकर नाव लावणार नाही, सहा विधानसभा क्षेत्रात भाजपाचा सुपडा साफ करण्याची घेतली प्रतिज्ञा…

चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या काँग्रेसच्या विजयी उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम गुरुवारी राजुरा येथे पार पडला. या सत्कार सोहळ्यात प्रतिभा धानोरकर यांनी भाजपला चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून हद्दपार करण्याचा निर्धार केला. ”येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मी स्वतः विधानसभा क्षेत्राची उमेदवार म्हणून प्रचार करेल. माझ्या लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा क्षेत्रात भाजपाचा सुपडा नाही साफ केला तर प्रतिभा धानोरकर नाव लावणार नाही” अशी गर्जना धानोरकर यांनी केली.

पुढे धानोरकर म्हणाल्या, या क्षेत्राची खासदार म्हणून विधानसभेची उमेदवारी मला वाटायची आहे. आमदारकीचे तिकीट मी सुभाष धोटे यांना देईनच मात्र सोबत त्यांना मंत्री पद मिळेल यासाठी प्रयत्न करेन. मला तिकीट मिळू नये यासाठी माझ्या पक्षातील काहींनी प्रयत्न केला. आमदार सुभाष धोटे यांना सुपारी देण्याचा प्रयत्नही झाला. सुधीर मुनगंटीवार घरी बसल्या निवडून येतील अशी प्लानिंग केली गेली. मात्र आमदार धोटे अमिषाला बळी पडले नाहीत. अगदी सुरवाती पासून माझ्या सोबतीला धोटे खंबीरपणे उभे होते. गडचिरोली जिल्ह्याला मंत्री पद मिळत असते. यावेळी चंद्रपूरला मंत्रीपद मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार, असं धानोरकर म्हणाल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;