वहिनीसाहेब खूपच तापट.. भारत-पाकिस्तान मॅचदरम्यान अनुष्काच्या ‘त्या’ व्हिडीओवर प्रतिक्रिया

वहिनीसाहेब खूपच तापट.. भारत-पाकिस्तान मॅचदरम्यान अनुष्काच्या ‘त्या’ व्हिडीओवर प्रतिक्रिया

न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियममधील अभिनेत्री अनुष्का शर्माचा ‘क्युट’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता तिचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. पती विराट कोहलीला पाठिंबा देण्यासाठी पोहोचलेली अनुष्का या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीसोबत अत्यंत रागात बोलताना दिसत आहे. नेमकं असं काय घडलं, ज्यामुळे अनुष्काचा राग अनावर झाला, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र या व्हिडीओमध्ये तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट राग दिसून येतोय. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

स्टेडियमच्या एका स्टँडवर उभी असलेली अनुष्का तिच्यासमोर असलेल्या व्यक्तीसोबत अत्यंत रागात बोलताना दिसतेय. तिच्या चेहऱ्यावर भावना पाहून नेटकरी संभ्रमात पडले आहेत. “वहिनी फारचा तापट होत आहेत”, असं एकाने लिहिलं. तर ”कोहलीचं संपूर्ण कुटुंबच आक्रमक स्वभावाचं आहे”, असं दुसऱ्याने म्हटलंय. काहींनी अनुष्काचीही बाजू घेतली आहे. ‘माणूस आनंदी आणि रागीट असू शकतो.. आपण सर्वजण असेच आहोत, यात अशी कोणती मोठी गोष्ट आहे’, असा सवाल एका युजरने केला.

पहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Mr.Hamxay (@mr_hamxay_2)

9 जून रोजी झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवलं होतं. या सामन्यानंतर अनुष्का रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह आणि युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री यांच्यासोबत ग्रुप फोटोमध्ये दिसली. धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हा फोटो पोस्ट केला होता. या सामन्यात जेव्हा विराट फक्त चार धावा करून बाद झाला, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसून आली. मात्र भारताच्या विजयाचा आनंद तिने सामन्याअखेर साजरा केला.

अनुष्का आणि विराट यांनी 2017 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2021 मध्ये अनुष्काने मुलगी वामिकाला जन्म दिला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात तिने मुलाला जन्म दिला. त्याचं नाव त्यांनी अकाय असं ठेवलंय. अनुष्काने अभिनयक्षेत्रातून काही काळ ब्रेक घेतला आहे. मात्र तिचा ‘चकदा एक्स्प्रेस’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रोसिज रॉय दिग्दर्शित या चित्रपटात अनुष्काने खेळाडूची भूमिका साकारली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;