काय सांगता! पाकिस्तानात गाढवांची संख्या वाढली

काय सांगता! पाकिस्तानात गाढवांची संख्या वाढली

पाकिस्तानात गाढवांची संख्या वाढली आहे. सरकारने जारी केलेल्या पशुधन आकडेवारीनुसार, या वर्षी गाढवांच्या संख्येत 1.72 टक्क्यांची वाढ होऊन ती सुमारे 59 लाख इतकी झाली आहे. मागील पाच वर्षांमध्ये एक ते दीड लाख गाढवं वाढली आहेत. पाकिस्तानातील कोसळलेल्या अर्थव्यवस्थेला गाढवांचा आधार आहे.  पशुपालन हा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तिथे 80 लाखांहून अधिक ग्रामीण कुटुंब पशुपालन करतात. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत गाढवांचा मोठा हातभार आहे. पाकिस्तानातून चीनमध्ये मोठय़ा प्रमाणात गाढवांची निर्यात होते. दरवर्षी पाच ते सात लाख गाढवं चीनमध्ये निर्यात होतात. त्यातून अर्थव्यवस्थेला आधार मिळतोय. गाढवांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील ओकार येथे डाँकी फार्म उभारण्यात आलेय. तसं पाहिलं तर चीनमध्ये गाढवांची संख्या 90 लाखांच्या आसपास आहे. मात्र वाढती मागणी पाहून चीन पाकिस्तानातून मोठय़ा प्रमाणात गाढवं आयात करत आहे. गाढवांच्या कातडय़ात जिलेटिन प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. या जिलेटीनपासून औषधांची निर्मिती चीनमध्ये मोठय़ा प्रमाणात होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;