ठाण्यात इमारतीचा काही भाग कोसळला; तीन जखमी, 30 बचावले
ठाण्यातील कलवार भागात बुधवारी रात्री एका निवासी इमारतीचा भाग कोसळल्याने तीन जण जखमी झाले, तर 30 हून अधिक जणांना वाचवण्यात आलं आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ओम कृष्णा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये घडली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून लोकांना बाहेर काढले.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इमारतीचा भाग कोसळण्याच्या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List