J&K Terror Attack : चार संशयित दहशतवाद्यांचे स्केच जारी; 20 लाखांचे बक्षीस जाहीर

J&K Terror Attack : चार संशयित दहशतवाद्यांचे स्केच जारी; 20 लाखांचे बक्षीस जाहीर

जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून दहशतवाद्यांचे हल्ले सुरू आहेत. बुधवारी सायंकाळी डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या पथकावर गोळीबार केला. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. तीन दिवसातील हा चौथा हल्ला असून या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या चार संशयित दहशतवाद्यांचे रेखाचित्र जम्मू-कश्मीर पोलिसांनी जारी केल आहे.

जम्म-कश्मीर पोलिसांनी डोडा जिल्ह्यातील दोन हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या चार संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी केली आहेत. त्यांची माहिती देणाऱ्यास 20 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक दहशतवाद्याची माहिती देणाऱ्यास 5 लाख रुपयांचे रोख बक्षीस पोलिसांनी जाहीर केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालेसा गावातील घनदाट जंगलातील कोटा टॉप भागामध्ये बुधवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. ही चकमक अद्यापही सुरुच असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात घेराबंदी करण्यात आली आहे. यादरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेत कॉन्स्टेबल फरीद अहमद हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, तत्पूर्वी मंगळवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी डोडा जिल्ह्यातील चटरगल्ला येथे वरच्या भागात असणाऱ्या जवानांच्या चेकपोस्टवर हल्ला केला होता. याच राष्ट्रीय रायफल्सचे पाच जवान आणि एक एसपीओ जखमी झाले होते. जैश-ए-मोहम्मदशी संबंधित कश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

कठुआमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-कश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादी हल्ल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. डोडा जिल्ह्यातील हल्ल्याआधी कठुआमध्येही दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक उडाली होती. यात एका दहशतवाद्याला मंगळवारी रात्री, तर दुसऱ्याला बुधवारी सकाळी गोळ्या घालून ठार करण्यात आले. या कारवाईदरम्यान निमलष्करी दलाचा एक जवानही शहीद झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;