पालिका, पोलीस, बिल्डरवर ऍट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा! काँग्रेसने केली राज्यपालांकडे कारवाईची मागणी 

पालिका, पोलीस, बिल्डरवर ऍट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा! काँग्रेसने केली राज्यपालांकडे कारवाईची मागणी 

 पवईतील जय भीम नगर झोपडपट्टी रिकामी करण्यासाठी दबाव आणणाऱया बिल्डर आणि त्यांना साथ देऊन रहिवाशांना सक्तीने बेघर करणाऱया, घरात घुसून मारहाण करणाऱया एस वॉर्डमधील पालिका आणि पवई पोलीस अधिकारी, कर्मचाऱयांविरोधात एससी-एसटी कायद्या अंतर्गत अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करा, अशी मागणी काँग्रेसने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन केली. शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांच्यासह जय भीम नगरचे रहिवाशी उपस्थित होते.

पवईत बिल्डरच्या सांगण्यावरून तीन पिढय़ांपासून 14 एकर जमिनीवर राहणाऱया जय भीम नगर झोपडपट्टीतील रहिवाशांना सक्तीने घराबाहेर काढण्यात आले. या वेळी त्यांना पवई पोलिसांनी काठीने अमानुष पद्धतीने मारहाणही केली आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. बिल्डरच्या सांगण्यावरून पालिका आणि पोलीस अधिकाऱयांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे संबंधितांवर अॅस्ट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा, पालिका कर्मचारी-पोलिसांना निलंबित करा, याची  न्यायालयाच्या वर्तमान न्यायाधीशांकडून चौकशी केली जावी, बेघर झालेल्या कुटुंबांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;