रियासीतील हिंदू भाविकांचे रक्त सुकले नाही, तोच डोडा, कठुआत अतिरेकी हल्ले! दोन अतिरेक्यांचा खात्मा, एक जवान शहीद

रियासीतील हिंदू भाविकांचे रक्त सुकले नाही, तोच डोडा, कठुआत अतिरेकी हल्ले! दोन अतिरेक्यांचा खात्मा, एक जवान शहीद

दिल्लीत एनडीएचे सरकार शपथ घेत असतानाच कश्मिरात अतिरेक्यांनी वैष्णोदेवीला जाणार्‍या हिंदू भाविकांच्या रक्ताचा सडा पाडला होता. ही घटना ताजी असतानाच गेल्या २४ तासांत पुन्हा अतिरेक्यांनी डोडा आणि कठुआ येथे जोरदार हल्ला चढवला. कठुआत लष्कराने दोन अतिरेक्यांचा खात्मा केला. डोडा जिल्ह्यात लष्कराच्या चेकपोस्टवर अतिरेक्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या चकमकीत एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे.

जम्मू-कश्मिरातून कलम ३७० हद्दपार केल्यानंतर तेथील दहशतवाद संपला असल्याचा दावा मोदी सरकारने केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही कश्मिरात शांतता नांदत असल्याची फुशारकी मारली होती. परंतु रियासी, डोडा आणि कठुआतील अतिरेकी हल्ल्यांनी हा दावा फोल ठरवला आहे.

रियासीतील भाविकांच्या बसवरील गोळीबाराची घटना अजून ताजी असतानाच काल रात्री डोडा जिल्ह्यातील छत्रगला येथे असलेल्या लष्कराच्या चेकपोस्टवर अतिरेक्यांनी गोळीबार केला. अतिरेक्यांच्या गोळीला जवानांनी गोळीनेच उत्तर दिले. या चकमकीत पाच जवान आणि लष्कराचा एक अधिकारी गंभीर जखमी झाला. अंधाराचा फायदा घेऊन अतिरेकी जंगलात पळाले. अतिरेक्यांच्या शोधासाठी तातडीने कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे. पूंछ, रियासी तसेच राजौरीच्या जंगलामध्ये अतिरेक्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

अतिरेक्यांनी दुसरा हल्ला कठुआ जिल्ह्यातील हिरानगर येथे केला. अतिरेकी लपल्याच्या सूचनेवरून या भागात शोधमोहीम राबवण्यात येत होती. लष्कराने आपल्याला चोहोबाजूने घेरल्याचे लक्षात येताच अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. लष्करानेही त्याला तडाखेबंद प्रत्युत्तर दिले. गोळीबारात ठार झालेल्या एका अतिरेक्याचा मृतदेह रात्रीच आढळला. दुसर्‍या अतिरेक्याचा खात्मा आज सकाळी करण्यात आला. काही अतिरेकी जंगलात पळून गेले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे, दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

अतिरेक्यांशी उडालेल्या धुमश्चक्रीत जी. डी. कबीरदास हा जवान शहीद झाला. कबीरदास छिंदवाडा येथील रहिवासी असून त्यांचे पार्थिव गुरुवारी येणार असून लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;