आई तू जग सोडून गेली असशील, पण तुझा आत्मा…’; मराठमोळ्या अभिनेत्रीची डोळ्यात पाणी आणणारी भावूक पोस्ट
जगात कोणीही कितीसुद्धा आपल्यावर प्रेम केलं तरी आईच्या प्रेमाची सर कोणाला येऊ शकत नाही. प्रत्येक आई आपल्या मुलाची स्वत:पेक्षा जास्त काळजी घेते. मायेची ऊब देणारी आई जेव्हा कायमची जाते तेव्हा तिची जाणीव आपल्याला प्रत्येक क्षणाला झाल्याशिवाय राहत नाही. अशातच एका मराठी अभिनेत्रीवर आईच्या जाण्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या आईसाठी तिने एक भावनिक पोस्ट लिहिली असून ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली दिसत आहे. मराठी अभिनेत्री पल्लवी सुभाष हिच्या आईचं निधन झालं आहे. आपल्या आईच्या आठवणीमध्ये पल्लवीने आईसोबतचा फोटो शेअर केल असून एक भावूक पोस्ट केली आहे.
अभिनेत्री पल्लवी सुभाषला मातृशोक
दुसऱ्या दिवशी सूर्य मावळत असताना, मी स्वतःला आपण शेअर केलेल्या असंख्य आठवणींची आठवण करून देत होते आई. तुझे अतूट प्रेम, तुझा हळुवार स्पर्श, तुझी सांत्वन देणारी उपस्थिती – हे माझ्या हृदयात आहेत. आज, जेव्हा मी तुझ्याविना माझ्या जीवनाचा प्रवास अनुभवत असताना मला तुझा निस्वार्थ पाठिंबा आणि लवचिकता या सर्व गोष्टींची आठवण येते. तुला जे कोणी भेटलं त्याला तू दाखवलेला दयाळूपणा, तुझ्या शब्दामधील सत्य यामध्ये आपलेपणा होता.
मला माहित आहे तु माझ्यावर लक्ष ठेवत आहेस. झे प्रेम माझ्याभोवती सांत्वन देणाऱ्या ब्लँकेटसारखे लपेटलेलं आहे. प्रत्येक नवीन दिवसाला धैर्याने सामोरे जाण्याचे सामर्थ्य देते. याचंच मला समाधान आहे. एकमेकांसोबत घालवलेल्या आठवणींना उजाळा देत वेळेची बंधन तोडत आपण लवकरच भेटू याची मला खात्री आहे.
तोपर्यंत मी तुझे प्रेम माझ्या हृदयात ठेवेल, आपण घालवलेला प्रत्येक क्षणाची कदर करते. माझ्या प्रत्येक गोष्टींमध्ये तुझ्या प्रत्येक गोष्टीत तुझ्या स्मृतीचा आदर करते. तू हे जग सोडून गेली असशील आई पण तुझा आत्मा त्या सर्वांच्या मनात असेल जे तुला ओळखतात आणि प्रेम करतात. तुझी कायमची आठवण येईल, तुझ्यावर मी कायम प्रेम करत राहिल, अशी भावनिक पोस्ट पल्लवी सुभाष यांनी केली आहे.
दरम्यान, पल्लवी सुभाष हिच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटमध्ये तिच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. पल्लवीने मराठी, हिंदी, तमिळ तेलुगू, कन्नड भाषांमध्ये काम केलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List