जामखेडमध्ये दुध उत्पादक शेतकरी तरूणावर कोयत्याने हल्ला, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

जामखेडमध्ये दुध उत्पादक शेतकरी तरूणावर कोयत्याने हल्ला, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

जामखेड शहरात दुध पोहोचवून घरी परतत असताना आरोळे वस्ती येथील एका किराणा दुकानासमोर अडवून युवकावर अचानक हल्ला करत कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी चार जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हल्ल्याचे कारण मात्र अद्याप समजु शकले नाही.

या प्रकरणी आरोपी प्रमोद प्रविण घायतडक रा. कोल्हेवस्ती, सलमान आत्तार (पुर्ण नाव माहीत नाही), रोहित शिवाजी गायकवाड व चॉंद नुर उर्फ आयन शेख तीघे रा. जामखेड आशा एकुण चार जणांनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी अशोक रतन म्हस्के वय 23 वर्षे रा. कोल्हेवस्ती, जामखेड हा सोमवार दि 10 रोजी सायंकाळी जामखेड शहरात डेअरी मध्ये दुध घालुन मोटारसायकल वरुन आपल्या कोल्हे वस्ती येथे घरी चालला होता. यानंतर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आरोळे वस्ती येथील एका किराणा दुकानासमोर आरोपींनी फीर्यादी अशोक म्हस्के याची मोटारसायकल आडवून गाडीची चावी काढुन घेतली.

यावेळी फिर्यादीने विचारले की, मला का थांबवले आहे असे विचारले असता आरोपी प्रमोद घायतडक त्यास म्हणाला की, तू येता जाता माझ्याकडे नेहमी खुन्नस ने का बघत असतोस? आज तुझी मस्ती जिरवतो असे म्हणुन फीर्यादीच्या दोन्ही हातावर कोयत्याने वार केले तर आरोपी नं दोन याने हातातील चाकूने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या कंबरेत चाकुने वार केले तर अन्य दोघांनी त्यांच्या हातातील काठ्यांनी फिर्यादीस बेदम मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी आशोक मस्के हा गंभीर जखमी झाला आसुन त्याच्यावर जामखेड येथील समर्थ हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी चार जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि वर्षा जाधव हे.कॉ प्रविण इंगळे, सरोदे, कोपनर, मंडगे, घोळवे पळसे देवा यांच्या पोलीस पथकाने तात्काळ आरोपींचा शोध घेत ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वर्षा जाधव या करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;