ह्यांचं कसं जमलं?; अभिषेक आणि सोनालीच्या प्रेमाची गोष्ट

ह्यांचं कसं जमलं?; अभिषेक आणि सोनालीच्या प्रेमाची गोष्ट

झी मराठीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतील श्रीनू अर्थात अभिनेता अभिषेक गावकर… अभिषेक लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर ‘सोनाली’ हिच्याशी अभिषेक विवाह करणार आहे. पण या दोघांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे. सोनाली आणि अभिषेक हे दोघे पहिल्यांदा कधी भेटले? प्रपोज कुणी कुणाला केलं? या सगळ्याबाबत सोनाली आणि अभिषेक यांनी एक व्हीडिओ शेअर केलाय. यात त्यांनी त्यांची प्रेमाची गोष्ट सांगितली आहे. दोघांच्या पहिल्या भेटीपासून ते लग्नाच्या निर्णयापर्यंतची गोष्ट या व्हीडिओच्या माध्यमातून त्यांनी सांगितली आहे.

अभिषेक गावकर हा अभिनेता आहे. झी मराठीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेत सध्या तो काम करत आहे. तर सोनाली ही सोशल मीडिया इफ्ल्युएंसर आहे. सोशल मीडियावर सोनालीच्या रील्सला नेटकऱ्यांची पसंती मिळते. अभिषेक आणि सोनाली लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. सोनालीने तिच्या यूट्यूबवर एक व्हीडिओ शेअर केलाय. यात या दोघांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितलीय.

पहिल्यांदा कुठे भेटले?

जीम करून त्यानंतर मी वडापाव खायला जात होते. त्यावेळी मला अभिषेक दिसला. आम्ही दोघं फेसबुकवर फ्रेंड होतो. मात्र पहिल्यांदाच त्याला मी समोरासमोर पाहिलं. मी खूपच वाईट अवतारात होते. त्यामुळे त्याने मला बघू नये असं वाटत होतं. घरी गेल्यावर मी त्याला मेसेज केला की मी तुला पाहिलं म्हणून… पण तो म्हणाला की मीपण तुला पाहिलंमग आम्ही चॅटिंग करू लागलो. पण मी मेसेज केला की त्यानंतर तो खूपच लेट रिप्लाय करायचा. पण मग एकेदिवशी अभिषेकनेच माझा नंबर मागितला. मग आम्ही भेटू लागलो, असं सोनालीने या व्हीडिओ सांगितलं.

प्रपोज कुणी कुणाला केलं?

सोनाली आणि मी रोज एकमेकांना भेटायचो. अगदीच काही काम असेल तर आमची भेट व्हायची नाही. पण शक्यतो आम्ही रोज एकमेकांना भेटायचो. तेव्हा सोनाली खूप फ्लर्ट करायची. पण मी तिला फार काही बोलायचो नाही. पण एकदा मी माझ्या मित्रांसोबत बाहेर गेलो होतो. तेव्हा मला तिची खूप आठवण आली. तेव्हा मी तिला I Love You असा मेसेज केला. त्यानंतर आम्ही एकमेकांना प्रॉपर डेट केलं. मग आम्ही एगेजमेंट करण्याचा निर्णय घेतला. आता लवकरच आम्ही लग्न करणार आहोत, असं अभिषेकने सांगितलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;