कुवैतमध्ये इमारतीला भीषण आग, 40 हिंदुस्थानी कामगारांचा मृत्यू तर, 50 हून अधिक जखमी

कुवैतमध्ये इमारतीला भीषण आग, 40 हिंदुस्थानी कामगारांचा मृत्यू तर, 50 हून अधिक जखमी

हिंदुस्थानी कामगार राहत असलेलल्या कुवैतमधील एका सहा मजली इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीमधील सर्व रहिवासी एकाच कंपनीतील कर्मचारी आहेत. या दुर्घटनेमध्ये 40 हिंदुस्थानी कामगारांचा मृत्यू झाला आहे.

सदर घटना कुवैतच्या दक्षिणी अहमदी गव्हर्नरेटच्या मंगफ भागात असलेल्या सहा मजली इमारतीमध्ये घडली आहे. 160 जणांचं वास्तव्य असणाऱ्या इमारतीमधील लोक एकाच कंपनीमधील कर्मचारी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या स्वयंपाकघरात बुधवारी पहाटेच्या दरम्यान आग लागली. या भयंकर दुर्घटनेत 40 हिंदुस्थानी कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिक जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कुवैतच्या हिंदुस्थानी दुतावासाने आपल्या ‘X’ या सोशल मीडिया अकाउंटवर त्या संदर्भात माहिती दिली. “आज हिंदुस्थानी कर्मचाऱ्यांशी निगडीत आगीच्या दुर्घटने संदर्भात दुतावासाने आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक +965-65505246 जारी केला आहे. सर्व संबंधितांना विनंती आही की या हेल्पलाइनशी संपर्क साधावा. दुतावासाच्या माध्यमातून शक्य ती सर्व मदत देण्यास दुतावास वचनबद्ध आहे”, अशी माहिती हिंदुस्थानी दुतावासाने दिली.

कुवैत टाइम्सने या घटनेचे वृत्त दिले आहे. कुवैतचे गृहमंत्री शेख फहद अल-युसूफ अल-सबाह यांनी सदर घटनेचा तपास पूर्ण होईपर्यंत इमारतीचा मालक, इमारतीचा सुरक्षारक्षक आणि कंपनीचा मालक यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;