भंडारा: NEET परिक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा! निकालाचे फेरमुल्यांकन करण्याची AISF ची मागणी
>> सूरज बागडे, भंडारा
NEET परिक्षेतील कथित घोटाळ्यावरून सर्वोच्च न्यायालयानं परीक्षांचं पावित्र्य भंग झाल्याची भावना व्यक्त करताना उत्तर द्यावे लागेल अशी भूमिका मांडली आहे. तर दुसऱ्याबाजूला विद्यार्थ्यांनी सरकारला लक्ष्य करत रस्त्यावर उतरून रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. या कथित घोटाळ्याची चौकशी करून निकालाचे फेरमुल्यांकन करा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांना बडतर्फ करा अशी मागणी भंडारा ऑल इंडिया स्टुडन्ट फेडरेशनकडून (AISF) करण्यात आली आहे.
डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगलेल्या विद्यार्थ्यांना NEET परीक्षेत झालेल्या घोटाळ्याचा मोठा फकटा बसला असून त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची भूमिका AISF मांडण्यात आली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरही अन्याय झाला असून सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. नीट परीक्षेतील कथित घोटाळा पाहता या प्रकरणाची सर्वंकश चौकशी करावी तसेच निकालाचे फेरमुल्यांकन करावे व तरुणीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांना बडतर्फ करा अशी मागणी ऑल इंडिया स्टुडन्ट फेडरेशन केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List