सोनाक्षी सिन्हाचा होणारा नवरा झहीरचं सलमान खान सोबत खास कनेक्शन

सोनाक्षी सिन्हाचा होणारा नवरा झहीरचं सलमान खान सोबत खास कनेक्शन

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. 23 जून रोजी अभिनेत्री बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीत जवळचे मित्र, कुटुंब आणि हीरामंडीच्या संपूर्ण टीमला निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. दोघांच्या लग्नाची पत्रिका एका मॅगझीनच्या मुखपृष्ठासारखी आहे. पत्रिकेत सुरुवातील अफवा खऱ्या आहेतय… असं लिहिल्याची माहिती समोर येत आहे.

कोण आहे अभिनेत्रीचा होणार पती झहीर इक्बाल

झहीर इक्बाल याचा जन्म 10 डिसेंबर 1988 मध्ये झाला आहे. त्याचं पूर्ण नाव झहीर इक्बाल रतनसी अलं आहे. झहीर याने मुंबई स्कॉटिश स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. ज्वेलर्स कुटुंबातून आलेले, त्याचे वडील इक्बाल रतनसी ज्वेलर्स आणि व्यापारी आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Zaheer Iqbal (@iamzahero)

 

झहीर इक्बाल याच्या कुटुंबातं सवमान खान याच्यासोबत फार जवळचं नातं आहे. झहीरची आई गृहिणी आहे, त्याची बहीण एक सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे आणि त्याचा धाकटा भाऊ कंप्यूटर इंजीनियर म्हणून काम करतो. सध्या सर्वत्र झहीर याची चर्चा रंगली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Zaheer Iqbal (@iamzahero)

 

झहीर याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने सलमान निर्मित ‘नोटबूक’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात झहीर याच्यासोबत दिवंगत दिग्गज अभिनेत्री नूतन यांची नात प्रनूतन हिने मुख्य भूमिका साकारली होती.

रिपोर्टनुसार, सलमान खान याच्यामुळे झहीर आणि सोनाक्षी यांची ओळख झाली. अखेर पहिल्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि कालांतराने प्रेमात झालं. दोघांनी ‘डबल एक्सएल’ सिनेमात देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. सिनेमात दोघांसोबत अभिनेत्री हुमा कुरेशी देखील होती.

सांगायचं झालं तर, सोनाक्षी हिला डेट करण्यापूर्वी झहीर याने दोन अभिनेत्रींना डेट केलं आहे. अभिनेत्री दिक्षा सेठ आणि सनी सईद दोघींना झहीर याने डेट केलं आहे. आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत लग्न करणार असल्याची माहिती मिळत आहे. पण अभिनेत्रीच्या कुटुंबियांमध्ये लग्नाबद्दल नाराजी असल्याचं चित्र दिसून येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;