… तर त्यांना पंतप्रधान बनण्याचा अधिकार नाही, उद्धव ठाकरे यांचा मोदींवर निशाणा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब यांच्या वचननाम्याचे बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर निशाणा साधला.
”सुशिक्षित मतदारसंघाचे वेगळे प्रश्न असतात. सर्व सामन्य मतदारांना जे प्रश्न असतात त्या प्रश्नासोबतच यांचे काही वेगळे प्रश्न असतात. शिकल्यानंतर, पदवी मिळाल्यानंतर पुढे काय हा मोठा प्रश्न असतो त्यांच्यासमोर. या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना शिवसेनेने सातत्याने त्यांच्यासाठी काम केलेलं आहे. मुंबईतील पदवीधर मतदारांना आवाहन करत आहे. जसे तुम्ही पाच टर्म तुमचे आशीर्वाद मतांच्या रुपाने शिवसेनेला दिलेले आहेत. ते नाते आपण अधिक दृढ करू. तुमच्या समस्या आम्ही प्रामाणिकपणे दूर करू. या वेळेलाही तुम्ही शिवसेनेला मत द्या. 26 जूनला निवडणूक आहे. त्या दिवशी सुट्टी नाहीए . कार्यालयात जाण्यापूर्वी शिवसेनेला मतदान करून मग कामाला जावं. ही हात जोडून विनंती करतो”, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पदवीधर मतदारांना केलेले आहे.
मोहन भागवत यांनी मणिपूरवरून केलेल्या वक्तव्यावरून तसेच जम्मू कश्मीरमध्ये होत असलेल्या हल्ल्यांबाबत पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. ” जम्मू कश्मीरमध्ये सतत हल्ले सुरू आहेत. अशात अब की बार वाले तिथे का जात नाहीत? कुठे गेले ते अब की बार वाले. कुणाची जबाबदारी आहे ही. मोहन भागवत यांनी वर्षभरानंतर मणिपूरवर वक्तव्य केलं. मणिपूर जळतोय असं ते बोलले मात्र अद्याप प्रधाननमंत्री, गृहमंत्री तिथे गेले नाही. त्यावर अद्याप काहीही बोलले देखील नाही. कश्मीरमधून 370 कलम हटवल्याचा प्रचार केला. मात्र त्यानंतर काय फरक पडलाय कश्मीरमध्ये. लोकांचे जीव जातच आहेत. नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलंय. त्यानंतर तीन दिवसांत तीन हल्ले झाले. अजुनही मोदी तिथे जाणार नाही का ? अजुनही मोदी प्रतिपक्षाला संपवण्यात आनंद मानत असतील. आणि त्यांना हे सर्व सांभाळलं जात नसेल तर त्यांना पंतप्रधान बनण्याचा अधिकार नाही”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List