सांगलीतील सुमारे 400 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष कोसळला

सांगलीतील सुमारे 400 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष कोसळला

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मिरज तालुक्यातील भोसे येथील सुमारे 400 वर्षांपूर्वीचे वडाचे झाड सोमवारी आलेल्या वादळी पावसात कोसळले. महामार्गास अडथळा ठरणाऱया या वटवृक्षाला वाचविण्यासाठी ‘वनराई’ संस्थेसह पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केले होते. मात्र, महामार्गाच्या कामात कमकुवत झालेला हा वटवृक्ष सततच्या पावसाने सोमवारी कोसळला. या वटवृक्षाचे आहे त्या जागी पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

भोसे येथील यल्लम्मादेवी मंदिरासमोर सुमारे 400 वर्षांपूर्वीचा हा वटवृक्ष आहे. नागपूर-रत्नागिरी महामार्गास अडथळा ठरणारा हा वटवृक्ष तोडण्याचा घाट महामार्ग प्राधिकरणाने घातला होता. मात्र, पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि ‘वनराई’ संस्थेच्या पदाधिकाऱयांनी वटवृक्षाखालीच उपोषण करून वृक्षतोडीला विरोध केला. या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हा वटवृक्ष तोडू नये, असे आदेश दिले. यासाठी कायद्यामध्येही बदल करण्यात आले. तर, आदित्य ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वटवृक्ष न तोडता रस्त्याचा आराखडा बदलण्याचे आदेश दिले. त्यानुसार नव्याने आराखडा बनवीत वटवृक्षाला खेटून हा महामार्ग पुढे नेण्यात आला. मात्र, या कामादरम्यान वृक्षाची मुळे कमकुवत झाली असावीत. गेले पाच दिवस या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. ओढय़ाला प्रचंड पाणी असल्याने हा वटवृक्ष स्वतःच्याच भाराने कोसळला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;