शेवगाव दरोडय़ातील टोळी जेरबंद; नगर गुन्हे शाखेची कारवाई

शेवगाव दरोडय़ातील टोळी जेरबंद; नगर गुन्हे शाखेची कारवाई

शेवगाव दरोडय़ातील 5 आरोपींना 48 तासांत जेरबंद करण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या टोळीकडून 1 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अनिल उर्फ यासिनखाँ शिवाजी भोसले, रोहन अनिल उर्फ यासिनखाँ भोसले, अमर दत्तू पवार, कृष्णा उर्फ सागर नारायण भोसले, सुनील बाबाखाँ भोसले अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत, तर या टोळीतील फरार साथीदार दीपक इंदर भोसले याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

या टोळीतील अनिल उर्फ यासिनखाँ शिवाजी भोसले याने त्याच्या साथीदारांसह शेवगाव येथे दरोडा घातल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सोमवारी समजली होती. तसेच नेवासा फाटा परिसरात सदर आरोपी असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावत आरोपींना अटक केली. दरम्यान, अनिल उर्फ यासिनखाँ शिवाजी भोसले याच्यावर नगर जिह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडीसह गंभीर गुन्हे दाखल आहेत.

दीपक बाबासाहेब जरांगे (रा. मारवाडी गल्ली, शेवगाव) यांच्या घरात 8 जून रोजी चोरटय़ांनी दरोडा टाकला होता. जरांगे यांच्या घरातील नागरिकांना चाकूचा धाक दाखवत आणि मारहाण करीत सुमारे 1 लाख 85 हजारांचा मुद्देमाल लुटला होता. यासंदर्भात शेवगाव ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुह्याचा तपास नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करत आरोपींना जेरबंद केले. दरम्यान, महिन्यापूर्वी चांदगाव उस्थळदुमाला, ता. नेवासा परिसरात चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, दत्तात्रय गव्हाणे, बापूसाहेब फोलाणे, संतोष लोढे, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, संदीप दरंदले, फुरकान शेख, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे व संभाजी कोतकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;