सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध? अभिनेत्रीचा भाऊ म्हणाला, ‘माझं काही घेणं-देणं नाही आणि…’

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध? अभिनेत्रीचा भाऊ म्हणाला, ‘माझं काही घेणं-देणं नाही आणि…’

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा – अभिनेता झहीर इक्बाल यांच्या लग्नाची चर्चा रंगील आहे. 23 जून रोजी सोनाक्षी – झहीर लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सोनाक्षी – इक्बाल अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी नात्याला पती – पत्नीचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण सोनाक्षी हिच्या कुटुंबियांना लग्न मान्य नाही असं चित्र दिसत आहे.

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यानंतर अभिनेत्रीता भाऊ लव सिन्हा याने देखील बहिणीच्या लग्नावर मोठं वक्तव्य केलं आहे.
लव सिन्हा म्हणाला, ‘मी सध्या मुंबईत नाही. माझं यासंबंधी काहीही घेणं-देणं नाही. यावर प्रतिक्रिया देण्याचा किंवा कोणत्याही प्रकारे अडकण्याचा माझा कोणताही हेतू नाही. मला रंगणाऱ्या चर्चांपासून दूर राहायचं आहे… असं अभिनेत्रीचा भाऊ म्हणाला. ज्यामुळे चाहत्यांना देखील धक्का बसला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Zaheer Iqbal (@iamzahero)

 

मुलीच्या लग्नाबद्दल कायम म्हणाले शत्रुघ्न सिन्हा?

सोनाक्षी हिच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘सोनाक्षी हिच्या लग्नाबद्दल मला काहीही माहिती नाही. मी सध्या दिल्लीत मध्ये आहे. निवडणुकीनंतर मी दिल्लीत आलो आहे. मी कोणासोबतच मुलीच्या लग्नाबद्दल काहीही बोललो नाही. मला अद्याप सोनाक्षीने लग्नाबद्दल काहीही सांगितलं नाही. मीडियामध्ये जे काय वाचत आहे, तेच मला माहिती आहे.’

‘जर सोनाक्षी लग्न करणार असेल तर, मी आणि माझी पत्नी मिळून सोनाक्षी – झहीर यांना आशीर्वाद देऊ. मला माझ्या मुलीच्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. ती कोणताच चुकीचा निर्णय घेणार नाही. एक अडल्ट असल्यामुळे ती स्वतःचे निर्णय घेऊ शकते. मला सांगायला आवडले की, सोनाक्षी लग्न करणार असेल तर, मला तिच्या लग्नात नाचायला आवडेल.’

‘मझ्या आसपासचे लोकं मला सोनाक्षीच्या लग्नाबद्दल विचारत असतात. मी फक्त एवढंच सांगेल की, आताची मुलं आई-वडिलांना काहीही सांगत नाही. त्यांची परवानगी घेत नाहीत फक्त निर्णय घेतात. मला देखील प्रतिक्षा आहे, की सोनाक्षी मला लग्नाबद्दल कधी सांगेल…’ असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;