उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची आयुक्तांनी घेतली ‘हजेरी’, नगरचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी अधिकाऱ्यांना बजावल्या नोटिसा
महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे हे मनपा प्रशासकीय मुख्य कार्यालयात सकाळी साडेनऊ वाजताच हजर झाले. यावेळी बोटांवर मोजण्याइतकेच कर्मचारी हजर होते. हे पाहताच आयुक्त संतापले आणि सर्व विभागांचे हजेरी रजिस्टर ताब्यात घेत गेटवरच खुर्ची टाकून बसले. त्यानंतर उशिरा येणाऱया अधिकारी आणि कर्मचाऱयांची आयुक्तांनी चांगलीच ‘हजेरी’ घेतली.
शिपाई साडेनऊ, तर अधिकारी यांना पावणेदहा वाजेपर्यंत कार्यालयात हजर असणे बंधनकारक असतानाही अधिकारी, कर्मचारी साडेदहा वाजेपर्यंत कार्यालयामध्ये येत नाहीत हे पाहताच आयुक्त यांचा पारा चढला. त्यांनी उशिरा येणाऱया प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱयांची हजेरी घेत खडेबोल सुनावले. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक कर्मचाऱयाकडून साडेदहा वाजल्यानंतर आल्याबाबतचे कारण लेखी घेण्यात आले. यावेळी उशिरा येणारे कर्मचारी, अधिकारी, प्रभाग अधिकारी, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त जावळे यांनी दिल्या.
मनपाच्या मुख्य कार्यालयात एकूण 155 कर्मचारी काम करीत असून, त्यातील कामावर वेळेत हजर असलेले कर्मचारी 16, उशिरा हजर असलेले कर्मचारी 122, या व्यतिरिक्त अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त, सर्व विभाग प्रमुख वेळेत हजर नाहीत. अशांना आयुक्त पंकज जावळे यांनी सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या व उशिरा येणाऱया सर्वांना एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List