छत्रपती संभाजीनगर : आकाशवाणी चौकात ट्रकने दाम्पत्याला उडविले; पत्नी ठार, पती जखमी

छत्रपती संभाजीनगर : आकाशवाणी चौकात ट्रकने दाम्पत्याला उडविले; पत्नी ठार, पती जखमी

मुंबईहून एका कार्यक्रमासाठी शहरातील महेशनगर भागात आलेल्या दाम्पत्याला आकाशवाणी चौकात रस्ता ओलांडताना गॅस सिलिंडरच्या ट्रकने उडविले. या अपघातात अनिता बाहेती या महिलेचा मृत्यू झाला, तर पती रतीलाल बाहेती हे गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी रात्री 8 वाजता घडला.

मुंबई येथील डोंबिवलीत राहणारे रतीलाल बाहेती आणि अनिता बाहेती हे दोघे दाम्पत्य महेशनगर भागात राहणार्‍या प्रा. धूत यांच्या घरी एका कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते दोघे जण आकाशवाणी चौकात आले. आकाशवाणी चौकातून रस्ता ओलांडत असताना भरधाव येणार्‍या एचपी कंपनीचे सिलिंडर घेऊन जाणार्‍या ट्रकने (एमएच 26 एच 5983) या दोघांना धडक दिली.

ट्रकच्या धडकेत रतीलाल बाहेती हे रस्त्याच्या काही अंतरावर फेकल्या गेले तर अनिता रतीलाल बाहेती ही महिला ट्रकच्या चाकाखाली सापडली. त्यांना नागरिकांनी तत्काळ घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी अनिता बाहेती यांना तपासून मृत घोषित केले.

या प्रकरणात ट्रक चालकाच्या विरोधात रात्री उशिरापर्यंत जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या अपघातातील जखमी रतीलाल बाहेती यांना आकाशवाणी चौकातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;