मी मरेपर्यंत शरद पवारांसोबतच, मिटकरींचा दावा सोनवणे यांनी धुडकावला

मी मरेपर्यंत शरद पवारांसोबतच, मिटकरींचा दावा सोनवणे यांनी धुडकावला

बीडच्या बप्पाचा दादांना फोन असे ट्विट अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले होते. यानंतर बीडचे नवनिर्वाचीत खासदार बजरंग सोनवणे यांनी हा दावा धुडकाकला. मी मरेपर्यंत शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

अमोल मिटकरी यांनी ट्विट केल्यानंतर खासदार बजरंग सोनवणे माध्यमांशी बोलताना म्हणाले, अमोल मिटकरी यांनी लोकसभेमध्ये किमान एखादा खासदार निवडून आणायला हवा होता. त्यानंतर त्यांनी दुसऱ्याच्या बाबतीत बोलावे. मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शरदचंद्र पवार साहेबांसोबतच असणार आहे. असे संभ्रम निर्माण करण्याचे प्रकार अमोल मिटकरी यांनी बंद करावेत, त्यांनी आधी एखादा ग्रामपंचायतीचा सदस्य निवडून आणावा, असा टोलाही लगावला. ते महाराष्ट्रातील जनतेला कनफ्यूज का करत आहेत. मिटकरींना माझी विनंती आहे की, ते आमदार झालेत ते डायरेक्टली झालेत. आता त्यांना पक्षाने काय पद दिलंय मला माहीत नाही, त्यांनी एकदा जनतेतून निवडून यावं आणि त्यानंतर दुसऱयांच्या उष्टीला हात घालावा ही माझी विनंती आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;