आयाराम आणि गयारामांचे किती लाड पुरवणार? सदाभाऊ खोत यांचा भाजपला सवाल
लोकसभा निवडणुकीतील हाराकिरीनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहेत. यासंदर्भाने बोलताना महायुतीचा घटक असलेल्या रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आयाराम आणि गयारामांचे किती लाड पुरवणार, असा सवाल भाजपला करत थेट मंत्रिपदाची मागणी केली आहे.
लोकसभा निवडणुकीत आम्हाला जाणवले की, आयाराम गयाराम यांचे किती लाड पुरवावेत यालाही काही निर्बंध असणं गरजेचं आहे. शेतमजूर आणि बारा बलुतेदार यांचं नेतृत्व आम्ही करतो, मग त्याचं प्रतिबिंब हे येणाऱया मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये उमटले पाहिजे. अन्यथा आमचे कार्यकर्ते फक्त लढण्यापुरतेच आहेत का अशी भावना निर्माण होईल, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List