गोड बोलून माझा काटा काढण्याचा कट! मनोज जरांगे यांचा सरकारवर आरोप

गोड बोलून माझा काटा काढण्याचा कट! मनोज जरांगे यांचा सरकारवर आरोप

एका बाजूला माझे बेमुदत उपोषण सुरू आहे आणि दुसर्‍या बाजूला सरकारकडून पुन्हा चर्चेचा खेळ सुरू झाला आहे. गोड बोलून माझा काटा काढण्याचा हा कट असल्याचा स्पष्ट आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. दरम्यान, उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगे यांची प्रकृती अधिक खालावली असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, सगेसोयर्‍यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी चौथ्यांदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता. पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी सरकार उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल संताप व्यक्त केला. माझ्या आंदोलनाची सरकार दरबारी दखल घेतली जात नसून मला खेळवण्यात येत आहे, असे जरांगे म्हणाले.

सरकारने उपोषणाची दखल घेतली नाही, तर मराठे सरकारला चांगलाच हिसका दाखवतील, असा विश्वासही मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचाही जरांगे पाटील यांनी समाचार घेतला.

उपचारासाठी प्रशासनाची विनंती
मनोज जरांगे यांची आरोग्य विभागाच्या पथकाने तपासणी केली. जरांगे यांचा रक्तदाब कमी झाला असून साखरेचे रक्तातील प्रमाणही घटले आहे. त्यांना प्रचंड ग्लानी आली असून आवाजही खोल गेला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील आणि तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. परंतु जरांगे यांनी त्यास नकार दिला. सरकार मागण्यांवर निर्णय घेत नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;