मी मरेपर्यंत शरद पवारांसोबतच; मिटकरींचा दावा सोनवणेंनी धुडकावला
On
बीडच्या बप्पाचा दादांना फोन असे टविट् अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले होते. यानंतर बीडचे नवनिर्वाचीत खासदार बजरंग सोनवणे यांनी हा दावा धुडकावला. मी मरेपर्यंत शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
अमोल मिटकरी यांनी ट्वीट केल्यानंतर खासदार बजरंग सोनवणे माध्यमांशी बोलताना म्हणाले, अमोल मिटकरी यांनी लोकसभेमध्ये किमान एखादा खासदार निवडून आणायला हवा होता. त्यानंतर त्यांनी दुसर्याच्या बाबतीत बोलावे. मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शरदचंद्र पवार साहेबांसोबतच असणार आहे. असे संभ्रम निर्माण करण्याचे प्रकार अमोल मिटकरी यांनी बंद करावेत, त्यांनी आधी एखादा ग्रामपंचायतचा सदस्य निवडून आणावा, असा टोलाही लगावला. ते महाराष्ट्रातील जनतेला कनफ्युज का करत आहे. मिटकरींना माझी विनंती आहे की, ते आमदार झालेत ते डायरेक्टली झालेत. आता त्यांना पक्षाने काय पद दिलंय, मला माहित नाही, त्यांनी एकदा जनतेतून निवडून यावं आणि त्यानंतर दुसर्यांच्या उष्टीला हात घालावा, ही माझी विनंती आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List