मलावीचे उपराष्ट्रपती सौलोस चिलिमा यांच्यासह 9 जणांचा विमान अपघातात मृत्यू
आफ्रिकन देश मलावीचे उपराष्ट्रपती सौलोस चिलिमा यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या अपघातात उपराष्ट्रपतींसह 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मलावीचे अध्यक्ष लाजर चकवेरा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या विमानातील सर्वांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी सौलोस चिलीमा यांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता झाले होते. मंगळवारी हे बेपत्ता विमान चिकंगवाच्या जंगलात सापडले. चोवीस तासांच्या शोध मोहिमेनंतर अपघात झालेले विमान सापडले. या विमानात मालवीचे उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमा, त्यांच्या पत्नीसह 9जण होते. हे विमान सोमवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेतील लिलोंगवे येथून सकाळी 9.17 वाजता निघाले होते. त्यानंतर 45 मिनीटांनी ते विमान माजुझू आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होतं, पण त्याआधीच हा अपघात झाला. अपघातानंतर हवाई वाहतून नियंत्रण कक्षाचा विमानाशी संपर्क तुटला. त्यानंतर युद्धपातळीवर शोध मोहीम सुरु होती. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विमान वाहतूक प्राधिकरणाने अनेकवेळा विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. अखेर मंगळवारी या विमानाचे अवशेष सापडले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List