अबोली – अंकुशच्या आयुष्यात येणार नवा ट्विस्ट; या प्रसिद्ध अभिनेत्याची होणार एण्ट्री
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'अबोली' या मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवत न्याय मिळवून देण्याचा अबोलीने घेतलेला वसा अनेकांसाठी आशेचा किरण ठरतोय.
नवनव्या केसचा छडा लावत असतानाच आता अबोलीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. या नव्या पात्राचं नाव आहे श्रेयस सुमन मराठे.
सुप्रसिद्ध अभिनेता माधव देवचके श्रेयस सुमन मराठे हे पात्र साकारणार आहे. अबोलीच्या विरोधात श्रेयस केस लढणार आहे. या नव्या आव्हानाचा अबोली आणि अंकुश कसा सामना करणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List