रंगावरून हिणवल्याने अक्षय कुमारच्या मुलीने घेतला हा निर्णय; ट्विंकलचा खुलासा

रंगावरून हिणवल्याने अक्षय कुमारच्या मुलीने घेतला हा निर्णय; ट्विंकलचा खुलासा

महिलेनं आज प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असली, एखाद्या क्षेत्रात पुरुषापेक्षा जास्त यश मिळवलं असलं किंवा स्वत:च्या जोरावर अस्तित्व निर्माण केलं असलं तरी सौंदर्याच्या प्रश्नाला कधी ना कधी प्रत्येकीला सामोरं जावं लागतं. सुंदरता आणि गोरं दिसणं या गोष्टींचं भारतीय समाजात किती महत्त्व आहे, हे काही वेगळं सांगायला नको. मग ते लहान मूल असो किंवा महिला.. नातेवाईकांपासून ते समाजातील असंख्य लोक तिला तिच्या दिसण्यावरून, वर्णावरून प्रश्न उपस्थित करताना दिसतात. अभिनेत्री ट्विंकल खन्नाने तिची मुलगी निताराबद्दलचा असाच एक किस्सा सांगितला. ट्विंकलने तिच्या ब्लॉगमध्ये याविषयी लिहिलं आहे.

नातेवाईकांनी त्वचेच्या रंगावरून टिप्पणी केल्यानंतर निताराने स्विमिंग सोडल्याचं तिने या ब्लॉगमध्ये सांगितलं. “माझ्या लेकीने एके दिवशी अचानक तिच्या स्विमिंग क्लासला न जाण्याचा निर्णय घेतला. स्विमिंगमुळे रंग सावळा झाल्याने तिने क्लासला न जाण्याचं ठरवलं होतं. मला भैय्यासारखा (भाऊ) रंग हवा आहे, असं ती म्हणाली. एका नातेवाईकाने तिच्या वर्णावरून टिप्पणी केली होती. ती क्युट दिसते पण तिच्या भावाइतकी गोरी नाही, असं ते म्हणाले होते”, असं तिने लिहिलं.

या वर्णभेदामुळे मुलीच्या मनात निर्माण झालेला न्यूनगंड दूर करण्यासाठी काय केलं, याविषयी सांगताना ट्विंकलने पुढे लिहिलं, ‘मी निताराला फ्रिडा काहलो यांचं इलुस्ट्रेटेड चरित्र वाचायला दिलं. सावळी चमकणारी त्वचा, मध्यभागी जोडणाऱ्या भुवया आणि एक आदर्श म्हणून अत्यंत प्रतिभावान स्त्री. हे वाचल्यानंतर आता ती म्हणते की तिच्या भावासारखं तिला सतत सनब्लॉक (सनस्क्रीन) वापरण्याची गरज नाही. पांढरा रंग हलका असल्याने तो माझ्या टी-शर्टसारखा लगेच मळू शकतो. सावळा रंग गडद असल्याने तो पटकन मळत नाही. पण त्वचेचा रंग हा आजच्या काळतही चर्चेचा विषय असू शकतो, हे पाहणं खूप निराशाजनक आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

ट्विंकल आणि अक्षयने 2001 मध्ये लग्न केलं. या दोघांना आरव हा मुलगा तर नितारा ही मुलगी आहे. अक्षय आणि ट्विंकलने बरीच वर्षे सोशल मीडियावर मुलीचा फोटो अपलोड केला नव्हता. निताराचे पाठमोरे फोटो किंवा ज्यात तिचा चेहरा दिसून येत नाही, असेच फोटो ते पोस्ट करायचे. मात्र आता निताराला ते पापाराझींसमोर मोकळेपणे आणतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;