कपिल शर्माच्या शोमध्ये खुर्चीवर बसून फक्त हसण्यासाठी तब्बल इतके रुपये घेते अर्चना
कॉमेडियन कपिल शर्माचा शो गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. बरीच वर्षे टीव्हीवर सुरू असलेला हा शो आता ओटीटीवरून प्रेक्षकांच्या भेटीला आला. नेटफ्लिक्सवर 'द ग्रेट इंडियन कपिल शो' नावाने हा कार्यक्रम नव्या रुपात प्रसारित झाला. यामध्ये आतापर्यंत बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
कपिलच्या शोमध्ये येणारे सेलिब्रिटी, त्यात विनोद सादर करणारे कलाकार नेहमी बदलत असले तरी समोर खुर्चीवर बसणारी परीक्षक कधीच बदलत नाही. नवज्योत सिंग सिद्धू यांच्यानंतर अभिनेत्री अर्चना पुरण सिंगने ही जागा घेतली आणि तेव्हापासून तीच कपिलच्या शोमध्ये परीक्षक बनून उपस्थित असते.
कपिल आणि इतर कलाकारांच्या विनोदावर अर्चना खळखळून हसते. तर अनेकदा कपिल त्यांना टोमणेसुद्धा मारतो. या कॉमेडी शोच्या आधी अर्चनाने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलंय. 'राजा हिंदुस्तानी', 'कुछ कुछ होता है' यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिका आजही प्रसिद्ध आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List