लातूर उदगीर रस्त्यावरील नळेगाव येथे पूल वाहून गेला

लातूर उदगीर रस्त्यावरील नळेगाव येथे पूल वाहून गेला

लातूर- उदगीर मार्गावरील नळेगाव येथे पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेला पूल वाहून गेला आहे. त्यामुळे सदर मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव यांनी कळविले आहे. अहमदपूर उपविभागीय महसूल अधिकारी मंजुषा लटपटे आणि चाकूरचे तहसीलदार जाधव यांनी पुलाची पाहणी करून तातडीने दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

पर्यायी वाहतुकीसाठी मार्ग पुढील प्रमाणे

लातूर – उदगीरला मार्गावरील वाहतुकीसाठी लातूर-चाकूर-उजळंब-कबणसांगवी -उदगीर रस्ता- मार्गे उदगीर (येरोळमोड जवळ). लातूर-चाकूर -उजळंब- रोहिना -हेर कुमठा -तोंडारमार्गे उदगीर. लातूर-लातूर रोड -सावरगाव -भाटसांगवी- अंजनसोंडा- उदगीर. सोबत शिरूर अनंतपाळमार्गेही लातूर ते उदगीर वाहतूक सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;