कंगना रनौत कानशिलात प्रकरण, चिराग पासवान म्हणाले, ‘महिला कॉन्स्टेबलच्या भावना समजू शकतो पण…’

कंगना रनौत कानशिलात प्रकरण, चिराग पासवान म्हणाले, ‘महिला कॉन्स्टेबलच्या भावना समजू शकतो पण…’

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत विजयाचा आनंद साजरा करत असतानाच एका महिला CISF जवानाने त्यांना कानशिलात लगावली. कंगना चंदीगड विमानतळावर असताना त्यांना महिला CISF जवानाने कानशिलात लगावली. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त करत कंगना यांचं समर्थन केलं. आता हाजीपूरचे खासदार आणि लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी देखील यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

चिराग पासवान म्हणाले, ‘तुम्ही तुमचं म्हणणं मांडण्यासाठी शिव्या आणि मारहाण करत असाल तर हे चुकीचं आहे. प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येक जण आपले विचार मांडू शकतो. महिला कॉन्स्टेबलच्या भावना देखील मी समजू शकतो, त्यांची त्याठिकाणी आई बसली होती, त्यांना वाईट वाटलं असेल. पण मर्यादीत शब्दांत त्यांनी स्वतःच्या भावना मांडायला हव्या होत्या…

पुढे चिराग पासवान म्हणाले, ‘प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वतंत्र्य आहे. कंगना यांनी स्वतःचं म्हणणं मांडलं. त्याच प्रमाणे महिला CISF जवानाने त्यांचं म्हणणं मांडायला हवं होतं. कोणतीही व्यक्ती महिला किंवा पुरुषावर हात उचलू शकत नाही. फक्त महिलांवर हात उचलू नये असं मी म्हणत नाही, पुरुषांवर देखील हात उचलणं चुकीचं आहे… तुम्ही विरोध करण्यासाठी मर्यादित शब्दांचा वापर करू शकता…’ सध्या सर्वत्र चिराग पासवान यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

कंगना रनौत हिचा राजकारणातील प्रवास

कंगना यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख तर निर्माण केलीच आहे. पण लोकसभा निवडणूक 2024 मध्ये देखील त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. कंगना यांनी हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयाचा झेंडा फडकावला आहे. प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकल्यामुळे कंगना चर्चेत आल्या.

चिराग पासवान यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, राजकारणात येण्यापूर्वी चिराग पासवान यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अभिनेत्री कंगना रनौत यांच्यासोबत चिराग यांनी पहिल्या सिनेमात काम केलं. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिले ना मिले हम’ सिनेमात दोघे एकत्र दिसले होते. सध्या चिराग पासवान यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;