सोनाक्षी सिन्हाचा होणारा नवरा झहीर इक्बाल किती श्रीमंत? दोघांच्या संपत्तीत मोठा फरक

सोनाक्षी सिन्हाचा होणारा नवरा झहीर इक्बाल किती श्रीमंत? दोघांच्या संपत्तीत मोठा फरक

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोनाक्षी येत्या 23 तारखेला बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्यासोबत लग्ना करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. ज्यामुळे दोघांच्या अनेक गोष्टी देखील समोर येत आहे. सध्या झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे. सोनाक्षी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री एका सिनेमासाठी जवळपास 3 कोटी रुपये मानधन घेते. जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील सोनाक्षी कोट्यवधी रुपयांची कमाई करते.

सोनाक्षी हिच्या गॅरेजमध्ये देखील अनेक महागड्या गाड्या आहेत. सोनाक्षी हिच्याकडे BMW 6 सीरीज (किंमत रु. 75 लाख), Mercedes-Benz S Class 350d (किंमत रु. 1.42 कोटी) आणि BMW i8 (किंमत रु. 3.30 कोटी) यांसारख्या महागड्या गाड्या आहे. अभिनेत्री तिच्या रॉयल लाईफमुळे देखील चर्चेत असते.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाक्षी सिन्हा हिच्याकडे जवळपास 100 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सोनाक्षी तिच्या कुटुंबासोबत मुंबईत राहाते. याशिवाय, 2023 मध्ये सोनाक्षी हिने स्वतःसाठी 4BHK आलिशान घर खरेदी केलं आहे. वांद्रे येथील केसी रोडजवळ असलेल्या 81 ओरियट बिल्डिंगमधील अपार्टमेंटची किंमत 14 कोटी रुपये आहे. यासाठी अभिनेत्रीने 55 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरलं असल्याची देखील माहिती समोर आली होती. 2020 मध्येही सोनाक्षी हिने 11 कोटी रुपयांचं घर घेतलं होतं.

सोनाक्षी हिच्याकडे आज कोणत्याचं गोष्टीची कमी नाही. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्णाण केल्यानंतर अभिनेत्री रॉयल आयुष्य जगत आहे. सोनाक्षी हिला फिरायला देखील प्रचंड आवडतं. अभिनेत्री व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत फिरायला जात असते.

झहीर इक्बाल याची संपत्ती…

झहीर इक्बाल यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, दोघांच्या नेटवर्थमध्ये फार मोठं अंतर आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नोटबूक’ सिनेमातून झहीर याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मीडिया रिपोर्टनुसार, झहीर याच्याकडे 1 ते 2 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

सिनेमांव्यतिरिक्त, झहीर ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून देखील कमाई करतो. झहीर याच्या कार कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याकडे मर्सिडीज बेंझ एम-क्लास सारखी आलिशान कार आहे. कार कलेक्शनच्या बाबतीतही तो सोनाक्षीच्या खूप मागे आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;