सैफ-करीनाच्या लग्नात वाढपी बनला होता ‘पंचायत’मधील ‘हा’ अभिनेता; वेब सीरिजने पालटलं नशीब
प्राइम व्हिडीओवरील सर्वांत लोकप्रिय वेब सीरिज 'पंचायत'मध्ये गणेशची भूमिका अभिनेता आसिफ खानने साकारली आहे. या सीरिजमधील त्याचा डायलॉग तुफान हिट ठरला. अभिनयक्षेत्रात काम करण्यापूर्वी आसिफने बराच संघर्ष केला.
'मिर्झापूर', 'पंचायत', 'पाताल लोक', 'पगलाइट' आणि 'ह्युमन' यांसारख्या वेब सीरिजमध्ये काम करून अभिनेता आसिफ खानला प्रसिद्धी मिळाली. 'पंचायत' या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये त्याच्या तोंडी असलेला 'गजब बेज्जती है यार' हा डायलॉग तुफान हिट ठरला. मात्र आसिफचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता.
आसिफने बराच संघर्ष करून अभियनविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. संघर्षाच्या काळात त्याने वेटरचंही काम केलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने याविषयीचा खुलासा केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List