आगामी विधानसभेसाठी जोमाने कामाला लागा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन

आगामी विधानसभेसाठी जोमाने कामाला लागा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नगर जिल्ह्याची ओळख होती. नगर दक्षिणेत महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके आणि उत्तरेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भाऊसाहेब वाघचौरे यांच्या विजयाने प्रस्थापित पक्षांना सुरुंग लागला. आता जोमाने कामाला लागा. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला हे गतवैभव काँग्रेस पक्षाला परत मिळवून द्या, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिकाऱयांना केले.

मागील काळात महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष ‘नो व्हेयर’ झालेला असताना, राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे अभिनंदन आणि सत्कार काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी केला. यावेळी संपतराव म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ उपस्थित होते.

नगर जिह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीला मिळवण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. मित्रपक्षांना सोबत घेऊन उमेदवारांना बळ दिले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि इतर पदाधिकाऱयांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने केलेल्या विशेष प्रयत्नामुळे दोन्ही जागा आपण मिळवू शकलो, असे पटोले यांनी सांगितले.

राज्यात काँग्रेस पक्षाचा खुंटा बळकट करण्यासाठी नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनी जे कष्ट घेतले, त्यामुळे राज्यात एकही खासदार नसतानाही 2024च्या या निवडणुकीत ती संख्या 13 वर नेली. विदर्भात एका जागेवर समाधान मानलेल्या काँग्रेसने यावेळी पाच जागा आणि महाविकास आघाडीने नऊ जागा मिळवल्या. हे यश काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठे बळ आणि आत्मविश्वास देणारे ठरले आहे, असे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी म्हटले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;