मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याचा थरार पाहण्यासाठी न्यूयॉर्कला गेलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचे हिंदुस्थानच्या सामन्यानंतर हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मुंबई क्रिकेट जगतावर शोककळा पसरली.

दोन वर्षांपूर्वी माजी कसोटीपटू संदीप पाटील यांचा पराभव करून अमोल काळे यांनी एमसीएच्या अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली होती. काल त्यांनी एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक आणि कार्यकारिणी सदस्य सूरज सामंत यांच्यासोबत हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याचा मनमुराद आनंद लुटला. मात्र सामन्यानंतर हॉटेलवर परतल्यावर अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि तेथेच त्यांचे निधन झाले. ते 47 वर्षांचे होते.

नागपूरमध्ये व्यावसायिक असलेले काळे यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मैत्रीचे संबंधही होते. याच संबंधांमुळे त्यांना मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष पद मिळाल्याचे बोलले जात होते. काळे यांनी गेल्या वर्षी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या टेनिस बॉल क्रिकेटच्या लीगसाठीही पुढाकार घेतला होता. त्यांच्याच नेतृत्वाखाली सचिन तेंडुलकरच्या पन्नासाव्या जन्मदिनी वानखेडे स्टेडियमवर सचिनचा पूर्णाकृती पुतळा बांधण्याचे ठरले होते.

मुंबई क्रिकेटला प्रोत्साहन देणार अध्यक्ष

अमोल काळे यांनी आपल्या दीड वर्षांच्या कारकिर्दीत मुंबई क्रिकेट आणि क्रिकेटपटूंच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. विशेष म्हणजे बीसीसीआयकडून विजेत्या संघाला पुरस्कार रुपाने जितकी रक्कम दिली जात असे तितकीच रक्कम त्यांनीही जाहीर केली. याच वर्षी मुंबईने रणजी जेतेपद पटकावताच त्यांनी संघाला पाच कोटींचे इनाम जाहीर केले. गत वर्षी वर्ल्ड कपच्या निमित्ताने त्यांनी वानखेडे स्टेडियमच सुखसुविधांनी सुसज्ज केले नाही तर प्रेसिडेंट बॉक्सचा अक्षरशः चेहरामोहराच बदलून टाकला. त्यांनी मुंबईच्या संभाव्य क्रिकेटपटूंना प्रोत्साहन म्हणून नुकतीच ‘होम ऑफ द चॅम्पियन्स’ ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमा अंतर्गत मुंबईच्या संभाव्य खेळाडूंना सर्व सोयीसुविधा देत मुंबई क्रिकेटसाठी घडवण्याचे ध्येय एमसीएने ठेवले आहे. त्यांनी आपल्या अध्यक्ष पदाच्या काळात खेळाडूंच्या निवडी संदर्भात निवड समिती सदस्यांनी पूर्ण अधिकार दिले होते. खेळाडूंना प्राथमिकता देण्याच्या निर्णयामुळे मुंबईने गेल्या वर्षभरात 7 अजिंक्यपदे जिंकून आपली ताकद दाखवून दिली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;