पदवीच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस आज संध्याकाळपर्यंत मुदतवाढ

पदवीच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस आज संध्याकाळपर्यंत मुदतवाढ

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025साठी पदवीच्या 3 आणि 4 वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठीच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. मंगळवार, 11 जून रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही मुदतवाढ असून या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व नोंदणी ते संबंधित महाविद्यालयात अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.

प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीसाठी http://muugadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे त्या महाविद्यालयाचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरणेदेखील अनिवार्य आहे.

प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी 25 मे ते 10 जून या कालावधीत घेण्यात आली. मात्र या कालावधीत एखाद्या विद्यार्थ्यास काही अपरिहार्य कारणास्तव नोंदणी अर्ज सादर करण्यास उशीर झाला असल्यास त्यांना संधी मिळावी या उद्देशाने ही मुदतवाढ दिली जात असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. तसेच विद्यापीठाच्या प्रचलित नियमानुसार व वेळापत्रकानुसार गुणवत्ता यादी ही त्या-त्या महाविद्यालयामार्फत जाहीर केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;